झील एज्युकेशन सोसायटीतर्फे "प्रजासत्ताक दिनानिमित्त " 3500 विद्यार्थी एक अनोखा उपक्रम साकारणार
पुणे,(सह्याद्री बुलेटीन)- झील एजुकेशन सोसायटीचे विद्यार्थी दरवर्षी वेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा करतात. यावर्षी सुद्धा राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी 3500 विद्यार्थी एक अनोखा उपक्रम साकारणार आहेत.
सदर उपक्रमांतर्गत 3500 हुन अधिक विद्यार्थी तिरंगा झेंडा तसेच भारताचे क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू व सुखदेव ह्यांची प्रतिकृती साकारणार आहेत. गेल्या वर्षी झील एज्युकेशन सोसायटीच्या 1800 विध्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने भारताच्या प्रतिकृती मध्ये तिरंगा साकारला होता.